रेंटोमोजो लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार
रेंटोमोजो लिमिटेडचा इनिशियल
पब्लिक ऑफर (आयपीओ)
बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होणार
प्रत्येक इक्विटी शेअरसाठी प्राईस बँड ३८४ रूपये ते ४०४ रूपये निश्चित करण्यात आला आहे
·
फ्लोर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रति
शेअर १ रूपया)
३८४ पट आणि कॅप प्राईस ४०४ पट आहे.
·
बिड/इश्यू ओपनिंग तारीख – बुधवार, ९
सप्टेंबर २०२६ आणि क्लोजिंग
तारीख – शुक्रवार,
११ सप्टेंबर २०२६ (“बिड
तारखा'')
·
अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख – मंगळवार, ८
सप्टेंबर २०२६
· किमान ३७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३७ इक्विटी शेअर्सच्या पटीत बिड्स (“बोली'') लावल्या जाऊ शकतात.
रेंटोमोजो लिमिटेडने ('कंपनी') आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) संबंधी
बिड/ऑफर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी खुला करण्याची घोषणा केली आहे.
या ऑफरचा प्राईस बँड प्रति इक्विटी शेअर ३८४ रूपये ते ४०४ रूपये
निश्चित करण्यात आला आहे. (‘प्राईस बँड')
किमान ३७ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३७ इक्विटी
शेअर्सच्या पटीत अर्ज केले जाऊ शकतात. (‘किमान
बिड लॉट').
अँकर इन्व्हेस्टर बिडिंग तारीख मंगळवार, ८
सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. हा बिड/ऑफर बुधवार, ९
सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल.
या ऑफरमध्ये १,५०० दशलक्ष रूपयांपर्यंतच्या
(१५० कोटी रूपये) (‘फ्रेश इश्यू') इक्विटी
शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा
आणि २,७३,६५,५२९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (‘ऑफर फॉर सेल' आणि फ्रेश इश्यूसह एकत्रित, ‘ऑफर') समावेश
आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य १ रूपया आहे.
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रक्कमेचा वापर
खालील उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते:
1.
कंपनीने घेतलेल्या काही थकित कर्जांची आणि त्यावरील
व्याजाच्या रक्कमेची पूर्ण किंवा अंशतः परतफेडीसाठी;
2.
कंपनीच्या गोदामांच्या आणि
एक्सपिरियन्स स्टोअर्सच्या (‘प्रीमाइसेस') भाडेपट्टा /
परवाना शुल्काचा (license
fee) भरणा करण्यासाठी;
आणि
3.
सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी.
या रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केलेले इक्विटी
शेअर्स स्टॉक एक्स्चेन्जेसवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी एनएसई
डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज असेल.
मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अडव्हायझर्स लिमिटेड, अॅक्सिस
कॅपिटल लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल
सिक्युरिटीज लिमिटेड) हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या नियम ३२(१) सह
वाचल्या गेलेल्या एससीआरआरच्या
नियम १९(२)(बी) अंतर्गत केली जात आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर
रेग्युलेशन्सच्या नियम ६(१) नुसार बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे केली जात आहे; ज्यामध्ये
नेट ऑफरच्या ५० टक्क्यांपेक्षा
जास्त भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”, आणि असा
भाग, “क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणात
वाटपासाठी उपलब्ध नसेल. मात्र,
सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार आमची कंपनी, बुक
रनिंग लीड मॅनेजर्सचा (बीआरएलएम)
सल्ला घेऊन क्यूआयबी पोर्शनच्या ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर इन्व्हेस्टर्सना स्वविवेकाधिकारावर (“अँकर
इन्व्हेस्टर पोर्शन”) वाटप करू
शकते; ज्यापैकी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या ४० टक्यांपर्यंत भाग पुढीलप्रमाणे राखीव असेल: (अ) ३३.३३ टक्क्यांपर्यंत घरगुती म्युच्युअल
फंडांसाठी; आणि (ब) ६.६७ टक्क्यांपर्यंत
आयुर्विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसाठी,
जे सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार अँकर इन्व्हेस्टर (“अँकर इन्व्हेस्टर अलोकेशन प्राईस”) वाटप किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत वैध
बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये कमी
सबस्क्रिप्शन झाल्यास किंवा वाटप न झाल्यास,
उर्वरित इक्विटी शेअर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये (अँकर
इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) (“नेट क्यूआयबी पोर्शन”) जोडले
जातील.
तसेच,
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५ टक्के भाग केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध असेल,
आणि उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शन हा ऑफर प्राईसवर किंवा
त्यापेक्षा जास्त किमतीत वैध बिड्स प्राप्त होण्याच्या अधीन राहून, म्युच्युअल
फंडांसह सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळून) प्रमाणात वाटपासाठी उपलब्ध
असेल. पण, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल
फंड पोर्शनमध्ये उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स सर्व क्यूआयबींना प्रमाणात
वाटप करण्यासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये जोडले जातील.
याशिवाय,
सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार नेट ऑफरच्या किमान १५% भाग
बिगर-संस्थात्मक बोलीदारांना ("एनआयबी")
वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी (अ) अशा पोर्शनपैकी एक-तृतीयंश भाग ०.२० दशलक्ष रूपयांपेक्षा (२ लाख रूपये) पेक्षा जास्त आणि १.०० दशलक्ष रूपयांपर्यंत अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; आणि (ब)
अशा पोर्शनपैकी दोन-तृतीयांश भाग १.०० दशलक्ष रूपयांपेक्षा जास्त
अर्जाचा आकार असलेल्या बोलीदारांसाठी राखीव असेल; जर या उप-श्रेण्यांपैकी कोणत्याही एका श्रेणीतील सबस्क्राइब
न झालेला भाग एनआयबीच्या दुसऱ्या उप-श्रेणीतील बोलीदारांना वाटप केला जाऊ शकतो.

Comments
Post a Comment