Wizz Financial तर्फे पहिले जागतिक क्रॉस-बॉर्डर वॉलेट सादर
पर्यटकांच्या वॉलेटपलीकडे : Wizz Financial तर्फे सर्व राष्ट्रीयत्वांसाठी, निवासी आणि अनिवासी ग्राहकांसाठी समानपणे यूपीआय आणि रेमिटन्सची सांगड घालणारे पहिले जागतिक क्रॉस-बॉर्डर वॉलेट सादर
एकच ॲप. भारतातील निवासी, अनिवासी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी समान यूपीआय
Wizz Financial तर्फे आज ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) 2026 मध्ये Wizz Financial ॲपचे अनावरण करण्यात आले. या ॲपद्वारे विविध प्रकारच्या वित्तीय सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ॲपमध्ये Wizz Financial च्या तंत्रज्ञानविषयक क्षमतांना भारतातील त्याच्या नेटवर्कची व्याप्ती, पोहोच आणि विश्वासार्हता यांची जोड देण्यात आली आहे. हे नेटवर्क 22 राज्यांमधील 360 हून अधिक शाखांच्या माध्यमातून 5 दशलक्षांहून अधिक ग्राहकांना सेवा देते.
या ॲपद्वारे ग्राहकांना देशांतर्गत येणाऱ्या आणि देशाबाहेर जाणाऱ्या रेमिटन्स सेवा, परकीय चलन, बहु-चलन प्रीपेड कार्ड्स, वित्तपुरवठा उपायसुविधा, जागतिक वापरकर्त्यांसाठी भारतातील यूपीआय तसेच बिल पेमेंट, मोबाइल रिचार्ज आणि प्रवास व व्हिसा सेवा उपलब्ध होणार आहेत.
या प्लॅटफॉर्मचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे SWITCH, ही Wizz Financial ची स्वमालकीची इंटरऑपरेबिलिटी पायाभूत सुविधा आहे. अमेरिका, यूएई आणि भारतातील Wizz Financial ची ॲप्लिकेशन्स तसेच सहभागी थर्ड पार्टी वॉलेट्स आणि वित्तीय प्लॅटफॉर्म यांना परस्पर जोडण्यासाठी तिची रचना करण्यात आली आहे.
SWITCH मुळे ग्राहकांना Wizz Financial च्या संपूर्ण परिसंस्थेमध्ये सहजपणे पैसे हस्तांतरित करता येतात. Wizz Financial च्या स्वमालकीच्या पेआउट नेटवर्कद्वारे क्रॉस-बॉर्डर पेआउट्सची सुविधा उपलब्ध असून हे नेटवर्क 80 हून अधिक देशांपर्यंत पोहोचते. हा प्लॅटफॉर्म Wizz Financial च्या अमेरिका आणि यूएईमधील सेवांना भारताच्या यूपीआय परिसंस्थेशीही जोडतो. त्यामुळे पात्र ग्राहकांना भारतीय यूपीआय खात्यांमध्ये रिअल-टाइम पद्धतीने पैसे हस्तांतरित करता येतात. यूपीआय One World चौकटीच्या माध्यमातून पात्र आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही लागू नियामक आवश्यकतांचे आणि निर्धारित मर्यादांचे पालन करून, भारतभर कॅशलेस पेमेंट करण्यासाठी Wizz Financial ॲपचा खऱ्या अर्थाने वापर करता येईल.
“यूपीआय ही जगाने आजवर उभारलेल्या सर्वात प्रभावी सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांपैकी एक आहे. सुरुवातीपासूनच आम्ही पंतप्रधानांच्या यूपीआय विषयक दृष्टिकोनाचा पाठपुरावा केला आहे आणि आता Wizz Financial भारताच्या सीमांपलीकडे हा दृष्टिकोन पुढे नेण्यात, खऱ्या अर्थाने जागतिक आणि क्रॉस-बॉर्डर यूपीआय परिसंस्था उभारण्यात आघाडीची भूमिका बजावत आहे याचा मला आत्यंतिक अभिमान आहे. SWITCH च्या माध्यमातून आम्ही अमेरिका, यूएई आणि भारतात पेमेंट्स, वॉलेट्स आणि क्रॉस-बॉर्डर पैशांची देवाणघेवाण या सगळ्या गोष्टी एकत्र आणत आहोत. यामुळे निवासी, अनिवासी आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना समान विश्वासार्ह नेटवर्कद्वारे पैसे हस्तांतरित करता येतील,” असे Wizz Financial चे संस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अमीर नागाम्मी यांनी सांगितले.
“सुलभता आणि उत्कृष्ट सेवांच्या माध्यमातून Wizz Financial ने भारतातील लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. देशभरातील आमच्या शाखांच्या जाळ्याला डिजिटल क्षमतांची जोड देऊन, ग्राहकांना त्यांच्या वित्तीय गरजांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्या व्यवस्थापित करण्याचा अधिक सोपा व सोयीस्कर मार्ग आम्ही उपलब्ध करून देत आहोत,” असे Wizz Financial India चे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णन आर. यांनी सांगितले.

Comments
Post a Comment