महिंद्रातर्फे XUV 3XO REVX श्रेणीचा विस्तार

 महिंद्रातर्फे XUV 3XO REVX श्रेणीचा विस्तार

XUV 3XO REVX EDGE सादर; सुरुवातीची किंमत 9.39 लाख रु.

पॅनोरॅमिक सनरूफ आता 10 लाख रु.पेक्षा कमी किमतीत (एक्स-शोरूम) उपलब्ध

26.03 सेमी HD इन्फोटेनमेंट सिस्टीमसह अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, क्रूझ कंट्रोल, लेदरेट सीट्स आणि रिअर-व्ह्यू कॅमेरा यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्ये आता अधिक ग्राहकांना सहज उपलब्ध

XUV 3XO REVX M(O) चा नवीन पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकार पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट; 10 लाख रु.पेक्षा कमी किमतीत (एक्स-शोरूम)

XUV 3XO ने 2.5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 2.5 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला; हा टप्पा गाठणारी महिंद्राची सर्वात वेगवान एसयूव्ही ठरली

पेट्रोल MT आणि AT तसेच डिझेल MT आणि AMT पर्यायांसह पॉवरट्रेनची अधिक व्यापक निवड


महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने आज XUV 3XO REVX EDGE सादर करण्याची घोषणा केली. त्याची सुरुवातीची किंमत 9.39 लाख रु. आहे. यामुळे प्रीमियम वैशिष्ट्ये ग्राहकांसाठी अधिक सुलभ झाली असून ग्राहकांना मिळणाऱ्या मूल्याची नवी उंची निश्चित झाली आहे. जोडीला कंपनीने पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह XUV 3XO REVX M(O) देखील सादर केली आहे.

2024 मध्ये सादर झाल्यापासून XUV 3XO ने अत्याधुनिक एसयूव्ही ग्राहकांच्या अपेक्षांपलीकडे कामगिरी केली आहे. आपल्या वेगळ्या आणि उठावदार डिझाइनसह, प्रीमियम इंटीरियर, आरामदायी राइड, अत्याधुनिक तंत्रज्ञान, रोमांचक कामगिरी आणि अतुलनीय सुरक्षेमुळे ती खऱ्या अर्थाने या श्रेणीतील बदल घडवून आणणारी एसयूव्ही ठरली आहे. XUV 3XO ने 2.5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 2.5 लाखांहून अधिक विक्रीचा प्रभावी टप्पा गाठला आहे. हा टप्पा गाठणारी ती महिंद्राची सर्वात वेगवान एसयूव्ही ठरली आहे.

गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या REVX मालिकेच्या पुढील वाटचालीवर आधारित या नवीन प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण शैलीसह प्रीमियम वैशिष्ट्ये यांचे मिश्रण आहे. तसेच, आता ग्राहकांच्या अधिक व्यापक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. XUV 3XO REVX EDGE दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल - 1.2 L mStallion TCMPFi: यामध्ये AT आणि MT ट्रान्समिशन पर्याय आहेत. तसेच 1.5 L Turbo Diesel with CRDe: यामध्ये AMT आणि MT ट्रान्समिशन पर्याय आहेत.

XUV 3XO REVX EDGE (एक्स-शोरूम किंमत: 9.39 लाख रु.): ड्युअल-टोन रूफ, बॉडी-कलर्ड ग्रिल आणि ब्लॅक व्हील कव्हर्स यातून REVX EDGE ची वैशिष्ट्यपूर्ण शैली तयार होते. आतील भागात ब्लॅक लेदरेट सीट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह 26.03 सेमी HD इन्फोटेनमेंट सिस्टीम, चार स्पीकर्स आणि स्टीअरिंगवर बसवण्यात आलेली ऑडिओ नियंत्रणे केबिनमधील अनुभव अधिक उंचावतात. क्रूझ कंट्रोल, रिअर-व्ह्यू कॅमेरा, उंची ॲडजस्ट करता येणाऱ्या ड्रायव्हिंग सीट्स, रिअर एसी व्हेंट्स आणि कप होल्डर्ससह रिअर आर्मरेस्ट यामुळे चालक आणि प्रवासी दोघांसाठीही दैनंदिन वापरातील सोय वाढते.

XUV 3XO REVX EDGE (O) (एक्स-शोरूम किंमत: 9.89 लाख रु.): REVX EDGE मधील सर्व वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, REVX EDGE (O) मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, रूफ रेल्स, इलेक्ट्रिकली फोल्ड करता येणारे बाहेरील रिअर-व्ह्यू मिरर्स, पॅसिव्ह कीलेस एंट्री, पुश-बटन स्टार्ट, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स आणि ऑटोमॅटिक वायपर्स देण्यात आले आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार