पारस हेल्थकेअर लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार
पारस हेल्थकेअर लिमिटेडचा इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ)
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला होणार
प्राइस
बँड प्रति इक्विटी शेअर ६६० रुपये ते ६९३ रुपये निश्चित करण्यात आला आहे
·
फ्लोअर
प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या (प्रति शेअर १ रुपया) ६६० पट आणि
कॅप प्राईस ६९३ पट आहे.
·
बोली/ऑफर
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली होईल आणि शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल
(“बोलीच्या तारखा”).
·
अँकर
गुंतवणूकदारांसाठी बोली/ऑफरचा कालावधी सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी असेल.
·
किमान
२१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २१ इक्विटी शेअर्सच्या
पटीत शेअर्ससाठी बोली लावता येईल (“बोलींची संख्या”)
पारस हेल्थकेअर लिमिटेड ("कंपनी") आपल्या इक्विटी शेअर्सच्या इनिशियल पब्लिक ऑफरच्या ("ऑफर") संदर्भातील बोली/ऑफर बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली करणार आहे. या ऑफरचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ६६० रुपये ते ६९३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. ("प्राइस बँड"). किमान २१ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २१ इक्विटी शेअर्सच्या पटीत शेअर्ससाठी बोली लावली जाऊ शकते. ("किमान बिड लॉट"). अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्याची तारीख सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ असेल. बोली/ऑफर बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी खुली होईल.
या ऑफरमध्ये ५०० कोटी रुपयांपर्यंत
ताज्या इक्विटी शेअर्सचा (फ्रेश इश्यू) समावेश असून सेलिंग शेअरहोल्डरद्वारे ९५० कोटी
रुपयांपर्यंत शेअर्सची विक्री (ऑफर फॉर सेल) केली जाणार आहे. या ऑफरचा एकूण आकार १,४५०
कोटी रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य १ रुपया आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या माध्यमातून
ऑफर केले जाणारे १ रुपया दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड
("बीएसई")
आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई", आणि बीएसईसह एकत्रितपणे
"स्टॉक एक्स्चेंजेस") या मान्यताप्राप्त शेअर बाजारांवर सूचिबद्ध
(लिस्ट) करण्याचा प्रस्ताव आहे.
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवते:
कंपनीने घेतलेल्या विशिष्ट थकीत कर्जांची पूर्ण किंवा अंशतः मुदतपूर्व परतफेड किंवा वेळेवर परतफेड करणे; पूर्ण मालकीची उपकंपनी प्लस मेडिकेअर हॉस्पिटल्स प्रायव्हेट लिमिटेड (“पीएमएचपीएल”) (जी श्रीनगरमधील हॉस्पिटलचे संचालनही करते) मधील कर्जांची पूर्ण किंवा अंशतः परतफेड/मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी त्या उपकंपनीमध्ये गुंतवणूक करणे; आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर.
जेएम फायनान्शियल लिमिटेड, बोफा
सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड हे या इश्यूसाठी बुक
रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स
(रेग्युलेशन) रूल्स, १९५७ च्या सुधारित नियम १९(२)(ब) ("एससीआरआर")
तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)
रेग्युलेशन्स, २०१८ च्या सुधारित नियम ३१ ("सेबी
आयसीडीआर रेग्युलेशन्स")
नुसार आणली जात आहे. सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ६(२) च्या अनुपालनानुसार बुक बिल्डिंग
प्रक्रियेद्वारे ही ऑफर दिली जात आहे. या अंतर्गत, ऑफरमधील किमान ७५ टक्के
हिस्सा क्वालिफाईड
इन्स्टिट्यूशनल बायर्सना ("क्यूआयबी"
आणि असा भाग, "क्यूआयबी पोर्शन")
प्रमाणशीर वाटपासाठी उपलब्ध असेल; पण
कंपनी बीआरएलएम्सच्या
सल्ल्याने सेबी आयसीडीआर नियमांनुसार क्यूआयबी पोर्शनमधील ६० टक्क्यांपर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना
स्वअधिकारानुसार
वाटप करू शकते ("अँकर इन्व्हेस्टर पोर्शन"). या अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमधील
४० टक्के
भाग खालीलप्रमाणे
राखीव ठेवला जाईल: (i) ३३.३३ टक्के
देशांतर्गत म्युच्युअल
फंडांसाठी; आणि (ii) ६.६७ टक्के
जीवन विमा कंपन्या
व पेन्शन फंडांसाठी उपलब्ध असेल.
.jpg)
Comments
Post a Comment