महिंद्रा’ने बाजारात आणली ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’; ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख
महिंद्रा’ने बाजारात आणली ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’;
ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख
किंमत ९.९९ लाख रुपयांपासून सुरू
टर्बो इंजिनची ताकद आणि श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क : सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारांत ८२ किलोवॅटची शक्ती मिळते. भारतातील सीएनजी प्रवासी गाड्यांमध्ये या गाडीचा २०० एनएम टॉर्क सर्वोत्तम आहे.
वेगवान सुरुवात : सीएनजीवर चालताना ही गाडी अवघ्या ४.९ सेकंदांत ताशी ३० ते ६० किलोमीटरचा वेग गाठते.
प्रगत सीएनजी तंत्रज्ञान : या श्रेणीत पहिल्यांदाच १० बार दाबाने सीएनजी इंजेक्शन देणारी यंत्रणा वापरण्यात आली आहे. यामुळे गाडीचा प्रतिसाद चांगला मिळतो आणि इंधनाचा कार्यक्षम वापर होतो.
टर्बो इंजिनमुळे उत्तम मायलेज : ही गाडी प्रति किलो सीएनजीमागे २४.७ किलोमीटरचे प्रमाणित मायलेज देते. त्यामुळे चांगली कामगिरी आणि कमी खर्चात गाडी चालवण्याचा फायदा मिळतो.
जागेचा कल्पक वापर : गाडीच्या तळाशी सीएनजीचे दोन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी सपाट तळ आणि डिक्कीमध्ये वापरता येण्याजोगी जागा मिळते.
सुरक्षा सुविधांचा समावेश : या गाडीची रचना ५-स्टार सुरक्षा मानांकनाच्या दृष्टीने करण्यात आली आहे. सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), ‘आयएसओफिक्स’ आणि ‘सीएनजी’साठीच्या विशेष सुरक्षा सुविधांसह ३५ हून अधिक सुविधा सर्व प्रकारांत देण्यात आल्या आहेत.
भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हिने ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’ ही आपली पहिली सर्वसामान्य ग्राहकांसाठीची सीएनजी प्रवासी कार बाजारात आणली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे सीएनजी गाड्यांमधूनही वेगवान आणि उत्साही ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो, हे दिसून येईल. या गाडीत टर्बोचार्ज्ड इंजिन आहे. सीएनजी आणि पेट्रोल या दोन्ही प्रकारच्या इंधनांवर हे इंजिन ८२ किलोवॅट शक्ती आणि २०० एनएम टॉर्क देते. ही गाडी प्रति किलो सीएनजीमध्ये २४.७ किलोमीटरचे प्रमाणित मायलेज देते. त्यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद कायम ठेवून इंधनावरील खर्च कमी करण्याचा पर्याय ग्राहकांना मिळतो. ‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मध्ये केवळ सीएनजीची बचतच नाही, तर टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी, आकर्षक डिझाइन, प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी प्रवास आणि सुरक्षितता यांचाही समावेश आहे. आकर्षक किमतीत उपलब्ध असलेली ही गाडी सीएनजी एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय आहे.
‘एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’मुळे एसयूव्ही खरेदी करणे अधिक ग्राहकांना शक्य होणार आहे. विशेषतः पहिल्यांदाच एसयूव्ही घेऊ इच्छिणाऱ्या आणि अधिक शक्तिशाली इंजिन व आधुनिक सुविधांची अपेक्षा असलेल्या ग्राहकांसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीच्या सुरुवातीच्या प्रकारातही २६.०३ सेंटीमीटरची एचडी टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, मागील सीटसाठी एसी व्हेंट्स आणि ६०:४० प्रमाणात विभागता येणारी मागील सीट अशा प्रीमियम सुविधा आहेत. साहजिकच, सीएनजीमुळे इंधनावरील खर्च कमी होतोच, शिवाय ‘एक्सयूव्ही ३एक्सओ’ची खास रचना, आधुनिक तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील सोयीही अनुभवता येतात. ड्रायव्हिंगच्या आनंदात कोणतीही तडजोड करावी लागत नाही.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष डॉ. वेलुसामी आर. म्हणाले, “’एक्सयूव्ही ३एक्सओ झेडएनजी’चे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही तडजोड न करता उत्तम अनुभव देणे. आजच्या ग्राहकांना ‘एसयूव्ही’मधील प्रशस्त जागा, आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव हवा असतो. त्याच वेळी सीएनजीमुळे इंधनावरील खर्चही कमी व्हावा, अशी त्यांची अपेक्षा असते. या गाडीत तिच्या श्रेणीतील सर्वोत्तम टॉर्क, टर्बोचार्ज्ड इंजिनची कामगिरी आणि प्रभावी मायलेज यांचा संगम आहे. त्यामुळे ‘सीएनजी’ची किफायतशीरता आणि एसयूव्ही चालवण्याचा आनंद या दोन्ही गोष्टी एकाच गाडीत मिळतात. ‘सीएनजी एसयूव्ही’कडून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही गाडी नवा मापदंड ठरवेल.”

Comments
Post a Comment