एकता सांस्कृतिक महोत्सव
एकता सांस्कृतिक महोत्सव
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या एकता कल्चरल अकॅडमीचे हे ३९ वे वर्ष असून, यंदाचा एकता सांस्कृतिक महोत्सव ताडदेव येथील. जनता केंद्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून . मुंबई आणि महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील तसेच महाविद्यालयीन कलावंतांना एकता सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष,कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केले आहे.
महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या ५०० कलावंतांना संस्थे तर्फे गौरवण्यात येणार आहे.
या महोत्सवातील समूह नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम द्वितीय,तृतीय असे रोख ₹.१२०००, ७०००, ५००० उत्तेजनार्थ तसेच पारंपरिक नृत्य, उत्कृष्ट दिग्दर्शन तसेच अभिनय स्पर्धा, कराओके गायन,तबला वादन स्पर्धे सह आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र देण्यात येतील . असे संस्थेचे उपाध्यक्ष,उज्जय आंबेकर , सचिव अभिजीत आळवे यांनी या पत्राद्वारे कळविले आहे,
अधिक माहितीसाठी संपर्क : वैशंपायन :9820209516, श्वेता :9220899120, अभिजीत :9869316419, सलोनी:8164903536, अक्षया:8369487240, दिनेश मोरे:8788391689
Comments
Post a Comment