सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजिजचा आयपीओ १५ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला
सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजिजचा आयपीओ १५ ऑक्टोबर २०२६ रोजी खुला
किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ३२७ ते ३४४ रुपये निश्चित
सहजानंद मेडिकल टेक्नॉलॉजिज लिमिटेड (“कंपनी”) ने तिच्या इक्विटी शेअर्सच्या इनिशिअल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रति इक्विटी शेअर ३२७/- ते ३४४/- रुपये किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा इनिशिअल पब्लिक ऑफर (“आयपीओ ” किंवा “ऑफर”) गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ४३ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ४३ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात. सध्याच्या तारखेनुसार एकूण १०१,६४६,७७८ इक्विटी शेअर्स आऊटस्टँडिंग (outstanding) आहेत.
या आयपीओमध्ये कंपनीचे प्रवर्तक 'श्री हरी ट्रस्ट' (Shree Hari Trust), प्रवर्तक समूहाचे सदस्य 'हिराजकुमार सजीभाई वसोया' (Dhirajkumar Savjibhai Vasoya), आणि खालील गुंतवणूकदार विक्री करणारे भागधारक (Investor Selling Shareholders): 'समरा कॅपिटल मार्केट्स होल्डिंग लिमिटेड' (Samara Capital Markets Holding Limited), 'कोटक प्री-आयपीओ अपॉर्चुनिटीज फंड' (Kotak Pre-IPO Opportunities Fund) आणि 'एनएचपीईए स्पार्कल होल्डिंग बी.व्ही.' (NHPEA Sparkle Holding B.V.) यांच्याद्वारे प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्याच्या एकूण १३,८२२,११६ इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर (ओएफएस) समाविष्ट आहे.
या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी २५०,००० इक्विटी शेअर्स राखून ठेवण्यात आले आहेत (“कर्मचारी आरक्षण भाग” - Employee Reservation Portion). कर्मचारी आरक्षण भाग वजा जाता उरलेल्या ऑफरला “नेट ऑफर” म्हटले जाते.
ही ऑफर बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे, SEBI ICDR नियमांच्या सुसंगततेने केली जात आहे, ज्यामध्ये नेट ऑफरपैकी ५०% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) असणार नाही, १५% पेक्षा कमी भाग बिगर-संस्थात्मक गुंतवणूक दारांसाठी (NIBs) असणार नाही आणि ३५% पेक्षा कमी इतका भाग किरकोळ वैयक्तिक गुंतवणूदारांसाठी (RIBs) राखण्यात आला आहे.
ही कंपनी १९९९ मध्ये एक भागीदारी फर्म म्हणून स्थापन झाली आणि त्यानंतर २००१ मध्ये जॉइंट स्टॉक कंपनी म्हणून समाविष्ट करण्यात आली. कंपनी ही एक क्लास III आणि क्लास C/D वैद्यकीय उपकरणे (Medical Devices) बनवणारी कंपनी असून व्हस्कुलर (रक्तवाहिन्या) आणि स्ट्रक्चरल हार्ट (हृदयाची रचना) इंटरव्हेंशनच्या क्षेत्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांचा पोर्टफोलिओ तिच्याकडे आहे. फ्रॉस्ट अँड सुलेवन (Frost & Sullivan) द्वारे तयार आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या “कार्डिओव्हस्कुलर डिव्हाइस मार्केटवरील स्वतंत्र बाजार संशोधन” (Independent Market Research on Cardiovascular Devices Market) या अहवालानुसार (“F&S अहवाल”), बायोडिग्रेडेबल पॉलिमर-बेस्ड पॅक्लिटॅक्सेल-एल्युटिंग स्टेंट (Infinnium) असलेल्या DES साठी सीई (CE) प्रमाणपत्र मिळवणारी ही जगातील पहिली कंपनी होती. गेल्या काही वर्षांत, कंपनीने संशोधन आणि विकासावर (R&D) आणि अचूक उत्पादन क्षमतेवर लक्ष केंद्रित करून अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणली आहेत, ज्यामुळे क्लिनिकल डेटाच्या आधारावर दर्जेदार उत्पादने प्रदान करणे तिला शक्य झाले आहे. ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तीन महिन्यांत भारतसह ६५ देशांमध्ये आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतसह ७७ देशांमध्ये तिचे कामकाज आहे.
ही एक R&D-ड्रिव्हन (संशोधन आणि विकास आधारित) कंपनी आहे जी क्लास III आणि क्लास C/D वैद्यकीय उपकरणांच्या विकासात गुंतलेली असून, तिचे मुख्य लक्ष व्हस्कुलर इंटरव्हेंशन (VI) आणि स्ट्रक्चरल हार्ट (SH) वर आहे. तिच्या (i) VI उत्पादनांमध्ये कोरोनरी स्टेंट्स आणि कोरोनरी बलूनसारख्या कोरोनरी इंटरव्हेंशन उत्पादनांचा समावेश होतो, (ii) SH उत्पादनांमध्ये TAVI आणि ऑक्लुडर्सचा समावेश होतो, आणि (iii) इतर उत्पादनांमध्ये तिचे स्वतःचे रीनल स्टेंट्सचे ब्रँड, पेरिफेरल DCBs आणि इतर ट्रेडिंग उत्पादनांचा समावेश आहे.
F&S अहवालांनुसार, भारतामधील ड्रग एल्युटिंग स्टेंट्स (DES) बाजारात कंपनीचा आघाडीचा बाजार हिस्सा आहे, ज्याचा वाटा आर्थिक वर्ष २०२६ मध्ये भारतातील एकूण DES विक्रीच्या प्रमाणाच्या जवळजवळ २५% होता. याशिवाय, F&S अहवालांनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत जर्मनी, स्पेन, पोलंड आणि ब्राझीलमध्ये DES च्या विक्री प्रमाणानुसार बाजार हिस्यात ती टॉप पाच कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. तसेच, ३१ मार्च २०२६ पर्यंत थायलंड, दक्षिण कोरिया आणि भारतातील ऑक्लुडर्सच्या विक्री प्रमाणानुसार बाजार हिस्यात ती टॉप पाच कंपन्यांमध्ये आहे.
कंपनीची रणनीती सततचे नवनवीन शोध (Innovation), तिचे उत्पादन पोर्टफोलिओ वाढवणे, विद्यमान उत्पादनांमध्ये सुधारणा करणे आणि विकसित होत असलेल्या क्लिनिकल आणि बाजारातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणे यावर केंद्रित आहे. ३० जून २०२६ नुसार, तिचे दोन R&D केंद्र आहेत – एक भारतात आणि दुसरे थायलंडमध्ये, जे बायोमेडिकल इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान विकास आणि क्लिनिकल संशोधनाचा अनुभव असलेल्या १५६ व्यावसायिकांच्या (चार सल्लागारांसह) टीमद्वारे चालवले जातात.
Comments
Post a Comment