आयटेलने भारतात १५ कोटी ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला
आयटेलने भारतात १५ कोटी ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केला
~ ग्राहकांचा विश्वास जिंकत ५जी व होम अप्लायन्सेस क्षेत्रात वेगाने विस्तार ~
भारतातील आघाडीच्या व्हॅल्यू-सेगमेंट कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या 'आयटेल' ने देशातील आपल्या १० वर्षांच्या यशस्वी प्रवासात १५ कोटी (१५० दशलक्ष) ग्राहकांचा ऐतिहासिक टप्पा पार केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. छोट्या शहरांमधील पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते फीचर फोनवरून स्मार्टफोनकडे वळणाऱ्या आणि घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा वापर वाढवणाऱ्या लाखो भारतीय कुटुंबांचा आयटेल हा एक अविभाज्य भाग बनला आहे. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार आयटेल हा ३६% मार्केट शेअरसह भारतातील नंबर १ फीचर फोन ब्रँड ठरला आहे, तर १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या एकूण फोन सेगमेंटमध्ये ३४% मार्केट शेअरसह ब्रँड आघाडीवर आहे.
आपल्या 'मेड टू लास्ट' या संकल्पनेला प्राधान्य देत आयटेलने केवळ मोबाईल फोनपुरते मर्यादित न राहता टीव्ही, होम अप्लायन्सेस, स्पीकर्स आणि अॅक्सेसरीज यांसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादन श्रेणींमध्ये आपला वेगाने विस्तार केला आहे. ब्रँडच्या टिकाऊपणाची साक्ष देत सिटी ३०० ५जी आणि पॉवर ८० ५जी यांसारख्या फोन्समध्ये आयपी रेटिंग आणि एमआयएल-एसटीडी प्रमाणपत्रांसारखी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय, पात्र मॉडेल्सवर १०० दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा, काउंटर-रिप्लेसमेंट कार्यक्रम आणि अॅक्वा, टफ आणि केअर या फीचर फोन इनोव्हेशन सीरिजच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सहज उपलब्ध विक्रीनंतरची सेवा आणि विश्वासार्हता प्रदान करत आहे.
या विशेष टप्प्यावर बोलताना आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले की, "१५ कोटी ग्राहकांचा टप्पा म्हणजे गेल्या दहा वर्षांपासून भारतीय कुटुंबांनी आयटेलवर दाखवलेल्या अखंड विश्वासाचे प्रतीक आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेऊन, त्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आकांक्षांशी जुळणारे विश्वासार्ह तसेच परवडणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या प्रयत्नांची ही पावती आहे. मोबाईल फोनपासून टीव्ही आणि होम अप्लायन्सेसपर्यंत भारतीय कुटुंबांच्या गरजांशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादन श्रेणींमध्ये विस्तार करणे हा आमच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिला असून पुढील टप्प्यात भारतभरातील ग्राहकांसाठी अधिक उपयुक्त तंत्रज्ञान आणि उत्तम अनुभव उपलब्ध करून देण्यावर आमचा भर कायम राहील."
सायबरमीडिया रिसर्चच्या अलीकडील अभ्यासात आयटेलने स्मार्टफोन श्रेणीत ०.८६ गुण मिळवत या सेगमेंटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर स्मार्ट डिव्हाइसेस श्रेणीत ०.८८ गुण मिळवून आघाडी घेतली आहे. या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, ८५% ग्राहकांनी आयटेलच्या उत्पादनांना उत्तम व्हॅल्यू-फॉर-मनी मानले आहे, ८१% ग्राहकांनी ब्रँडची ओळख मजबूती व टिकाऊपणाशी जोडली आहे आणि ७४% ग्राहकांनी आयटेलला अत्यंत विश्वासार्ह ब्रँड मानले आहे. देशभरात १,००० हून अधिक सर्व्हिस सेंटर्सच्या मजबूत नेटवर्कसह आयटेल आगामी काळात स्मार्टफोन्स, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसच्या श्रेणींमध्ये नवीन उत्पादने लाँच करून अधिक भारतीय कुटुंबांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे.

Comments
Post a Comment