स्वरा बेबी प्रॉडक्ट्सचा आयपीओ २ डिसेंबर २०२६ रोजी खुला

 स्वरा बेबी प्रॉडक्ट्सचा आयपीओ २ डिसेंबर २०२६ रोजी खुला

स्वरा बेबी प्रॉडक्ट्स लिमिटेड आपल्या प्रत्येकी रु. २ दर्शनी मूल्याच्या समभागांचा  आयपीओ (प्रारंभिक सार्वजनिक निर्गम) बुधवार, २ डिसेंबर २०२६ रोजी उघडणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीचा दिवस मंगळवार, १ डिसेंबर २०२६ असून निर्गम बंद होण्याची तारीख शुक्रवार, ४ डिसेंबर २०२६ आहे. या निर्गमाची किंमत पट्टी प्रत्येकी रु. २ दर्शनी मूल्याच्या समभागासाठी रु. १०५ ते रु. १११ इतकी निश्चित करण्यात आली आहे. किमान १३५ समभागांसाठी व त्यानंतर १३५ च्या पटीत बोली लावता येईल.

या निर्गमात कंपनीकडून नवीन समभागांची विक्री रु. ५००० दशलक्ष (रु. ५०० कोटी) पर्यंत तर काही विद्यमान भागधारकांकडून समभागांची विक्री रु. ३००० दशलक्ष (रु. ३०० कोटी) पर्यंत समाविष्ट आहे. यात ब्रेनबीज सोल्युशन्स लिमिटेडकडून रु. १५०० दशलक्ष (रु. १५० कोटी) व अनाद्या बॉन मर्चरी एलएलपीकडून रु. १५०० दशलक्ष (रु. १५० कोटी) इतके समभाग विक्रीसाठी आहेत.

हा निर्गम सेबीच्या नियमांनुसार बुक बिल्डिंग पद्धतीने होणार आहे. एकूण निव्वळ निर्गमापैकी जास्तीत जास्त ५० टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव असून त्यापैकी ६० टक्के भाग अँकर गुंतवणूकदारांना देण्याचा अधिकार कंपनीला असेल. त्यात देशी म्युच्युअल फंडांसाठी ३३.३३ टक्के व जीवन विमा कंपन्या तसेच निवृत्तीवेतन निधीसाठी ६.६७ टक्के भाग राखीव ठेवण्यात आला आहे. निव्वळ निर्गमापैकी किमान १५ टक्के भाग बिगरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी व किमान ३५ टक्के भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. या समभागांची बीएसई व एनएसई या दोन्ही बाजारपेठांवर सूचीबद्धता प्रस्तावित आहे. या निर्गमासाठी जेएम फायनान्शियल लिमिटेड व अॅव्हेन्डस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार