ट्रस्ट म्युच्युअल फंडकडून अनूप सेठ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती
ट्रस्ट म्युच्युअल फंडकडून अनूप सेठ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती
मुंबई, 25 नोव्हेंबर 1026: ट्रस्ट म्युच्युअल फंडने आज अनूप सेठ यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. त्यांची नियुक्ती २० नोव्हेंबर २०२६ पासून प्रभावी झाली आहे.
अनूप सेठ यांना वित्तीय सेवा, रिटेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म क्षेत्रात व्यवसाय उभारणी आणि विस्ताराचा २६ वर्षांहून अधिक अनुभव आहे. ते ट्रस्ट म्युच्युअल फंडच्या विकासाच्या पुढील टप्प्याचे नेतृत्व करणार आहेत. ग्रुपची संस्थात्मक कार्यपद्धती आणि शिस्त कायम राखत मोठ्या प्रमाणावर रिटेल-केंद्रित व्यवसाय उभारणे आणि भारतीय कुटुंबांकडून वित्तीय बाजारपेठांमध्ये बचतीची वाढती गुंतवणूक लक्षात घेता गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
त्यांच्या प्रमुख प्राधान्यक्रमांमध्ये अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचणे, मल्टी-चॅनल वितरण नेटवर्कचा विस्तार करणे, उत्पादनांची श्रेणी अधिक प्रभावी बनवणे तसेच ब्रँड आणि भागीदारीचे नेटवर्क मजबूत करणे यांचा समावेश आहे.
अनूप सेठ यापूर्वी एडेलवाइस लाइफ इन्शुरन्समध्ये संचालक आणि मुख्य वितरण अधिकारी (Director & Chief Distribution Officer) म्हणून कार्यरत होते. या पदावर ते वितरण, धोरण, विपणन आणि डिजिटल उपक्रमांची जबाबदारी सांभाळत होते. ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवणे, वितरण नेटवर्कचा विस्तार करणे आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या टीम्स उभारणे या क्षेत्रांत त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे.
यापूर्वी त्यांनी रिलायन्स निप्पॉन लाइफ, एचडीएफसी (HDFC) लाइफ, आयडीबीआय फेडरल लाइफ आणि फ्युचर ग्रुपमध्ये वरिष्ठ नेतृत्वाच्या पदांवर काम केले आहे. याशिवाय, ते डिजिटल व्हेंचर असलेल्या Inmatch Internet Ventures चे सह-संस्थापकही राहिले आहेत.
ट्रस्ट म्युच्युअल फंडच्या स्थापनेपासून CEO म्हणून नेतृत्व करणारे संदीप बागला आता ट्रस्ट ग्रुपमध्ये अधिक व्यापक नेतृत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांची प्रेसिडेंट – स्ट्रॅटेजी अँड सिनर्जीज (President – Strategy & Synergies) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्ट म्युच्युअल फंड भारतीय म्युच्युअल फंड उद्योगातील वेगाने उदयास येणारा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. नव्या भूमिकेत ते आपल्या अनुभवाचा उपयोग ट्रस्ट ग्रुपच्या विविध व्यवसायांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी करणार आहेत.
उत्पल शेठ, संस्थापक आणि संचालक, ट्रस्ट म्युच्युअल फंड म्हणाले: “अनूप यांचे ट्रस्ट परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ट्रस्ट म्युच्युअल फंडला एक वेगळी ओळख असलेला मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. वितरण नेटवर्कच्या विस्तारासाठी अनूप यांचे नेतृत्व आणि त्यांचा सिद्ध अनुभव या प्रवासाला अधिक गती देईल, असा आम्हाला विश्वास आहे. म्युच्युअल फंडची स्थापना आणि त्याच्या विकासामध्ये संदीप यांनी केलेल्या नेतृत्वाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून कौतुक करतो. तसेच ग्रुपच्या विविध व्यवसायांमध्ये सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी त्यांची सातत्यपूर्ण भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
संदीप बागला, प्रेसिडेंट – स्ट्रॅटेजी अँड सिनर्जीज, ट्रस्ट ग्रुप म्हणाले:“ट्रस्ट म्युच्युअल फंडची उभारणी करणे हा माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि अविस्मरणीय प्रवास राहिला आहे. आमची टीम, गुंतवणूकदार आणि वितरण भागीदार यांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेले सहकार्य यामुळेच हे शक्य झाले आहे. मी अनूप यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि या नव्या अध्यायासाठी त्यांना तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो.”
मिहिर वोरा, मुख्य गुंतवणूक अधिकारी (Chief Investment Officer), ट्रस्ट म्युच्युअल फंड म्हणाले:“अनूप यांच्यासोबत ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याचा एक भक्कम दृष्टिकोन आहे. यामुळे आमचे गुंतवणूकविषयक कौशल्य आणि मजबूत गुंतवणूक प्रक्रिया अधिक प्रभावी होईल. आमची गुंतवणूक धोरणे अधिकाधिक गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आमच्या भागीदारांसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”
अनूप सेठ, मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), ट्रस्ट म्युच्युअल फंड म्हणाले:“म्युच्युअल फंड हे आज भारतात दीर्घकालीन बचत आणि गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे माध्यम बनत आहेत. आपल्या उद्योगाची खरी जबाबदारी ही सुनिश्चित करणे आहे की, बाजारातील प्रत्येक चढ-उतार आणि कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीशी जोडलेले राहावे.या व्यवसायात विश्वास हीच सर्वात मोठी भांडवलाची ताकद आहे आणि ज्या फंड हाऊसच्या नावात ‘ट्रस्ट’ आहे, त्याच्यासाठी हा एक शब्द नसून एक वचनही आहे.ट्रस्ट म्युच्युअल फंडने एक शिस्तबद्ध आणि संशोधनाधारित गुंतवणूक प्रक्रिया विकसित केली आहे. आता हा विश्वास मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही अधिक चांगली आणि केंद्रित उत्पादने, वितरकांसोबत मजबूत भागीदारी, पारदर्शक संवाद आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ अनुभव यावर लक्ष केंद्रित करणार आहोत.भक्कम पाया उभारल्याबद्दल मी संदीप आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. या पायावर पुढील वाटचाल करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
या नियुक्तीमुळे ट्रस्ट म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूक क्षमतांना व्यापक वितरण नेटवर्क आणि मजबूत डिजिटल सहभागाची जोड देऊन गुंतवणूकदारांसोबत दीर्घकालीन आणि विश्वासार्ह संबंध प्रस्थापित करणार आहे.
एक मजबूत आणि शाश्वत मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय उभारणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर गुंतवणूकदारांमध्ये जागरूकता वाढवणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी उद्योगाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्यावरही कंपनी भर देणार आहे. यामध्ये देशातील मोठ्या शहरांसोबतच लहान शहरे आणि दुर्गम भागांतील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्याचाही समावेश आहे.

Comments
Post a Comment