टेकमसेहने भारतात ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन केले
टेकमसेहने भारतात ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे उद्घाटन केले नवोन्मेषकारी व्यावसायिक रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी टेकमसेहने भारतात आपल्या अत्याधुनिक ग्लोबल टेक्नोलॉजी सेंटरचे अधिकृतरित्या उद्घाटन केले . या केंद्रामुळे टेकमसेहच्या अमेरिका , फ्रान्स आणि ब्राझिलमधील इंजिनीअरिंग लॅब्जच्या नेटवर्कमध्ये नवीन भर पडली आहे . याद्वारे टेकमसेहने आपल्या अत्याधुनिक कॉम्प्रेसर्स व मूल्यवर्धित सिस्टम सोल्युशन्समधील जागतिक स्तरावरील संशोधन व विकासासाठीच्या गुंतवणुकीत आणखी वाढ केली आहे . हे केंद्र स्थापन करण्यासाठी दिल्लीजवळील ठिकाण विशिष्ट धोरणाने निवडण्यात आले आहे . या भागात डिझाइन व उत्पादन कारखाने असलेल्या अन्य जागतिक दर्जाच्या तसेच आघाडीच्या ओईएम ब्रॅण्ड्ससोबत भागीदारी व सहयोग दृढ करण्यासाठी या स्थळाची निवड करण्यात आली आहे . टेकमसेहचे अध्यक्ष व मुख्...