टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी
टाटा रियल्टी आणि सेल्सफोर्स यांची एआय-आधारित ग्राहक सेवेसाठी भागीदारी भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक असलेली टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी, सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून 24 तास ग्राहक सेवा आणि रिअल-टाइम माहिती उपलब्ध करून देत आहे. यामुळे ग्राहकांना उत्तर मिळण्याचा वेळ काहीकाही दिवसांवरून कमी होऊन 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच ईमेल उघडण्याचे प्रमाण 50–60% पर्यंत वाढले आहे. टाटा सन्सची प्रमुख उपकंपनी असलेल्या टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (टीआरआयएल) आणि जगातील नंबर 1 एआय सीआरएम कंपनी असलेल्या सेल्सफोर्सने आज टीआरआयएलच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये ग्राहक संवाद सुधारण्यासाठी सेल्सफोर्सच्या एजंटफोर्स प्लॅटफॉर्मच्या यशस्वी उपयोजनाची घोषणा केली आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे ग्राहकांशी संवाद अधिक जलद आणि सोपा झाला आहे. ग्राहकांना उत्तर देण्याचा वेळ काही दिवसांवरून कमी होऊन आता फक्त 8 तासांपर्यंत आला आहे. तसेच कंपनी आता एकाच वेळी हजारो ग्राहकांशी सहज संपर्क साधू शकते. असे गिरीश हड़कर , टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक...