'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड'
'बबन'ने साजरी केली चिखलाची अनोखी 'धुळवड' ग्रामस्थांसमवेत पारंपारिक पद्धतीत साजरी झाली 'होळी' धुळवड म्हणजे रंगाचा खेळ, रंगाची उधळण करणा-या या उत्सवाचा नुकताच 'बबन' सिनेमातील संपूर्ण टीमने एका वेगळ्याच प्रकारे आनंद लुटला. होळीच्या मुहूर्तावर अहमदनगर येथील म्हसे गावात पार पडलेल्या या उत्सवामध्ये चिखलाची अनोखी 'धुळवड' साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, आतापर्यंत साजरा करण्यात आलेल्या इको फ्रेंडली रंगपंचमीतल्या या अनोख्या धूळवडीचा स्थानिक नागरिकांनीदेखील मनसोक्त आनंद लुटला. द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित या सिनेमाचे राष्ट्रीयपुरस्कार प्राप्त 'ख्वाडा'फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाच्या मोशन आणि टीझर पोस्टरवर देखील दोन प्रेमीयुगुल चिखलाने माखले असल्याचे दिसून येते. याचाच संदर्भ घेत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील म्हसे गावात अनेक प्रेमी जोडप्यांना घेऊन चिखलातील अनोखी धुळवड साजरी करण्यात आली. याबद्दल बोलताना सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव नानासाह...