मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम
मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम एमिरेट्स स्कायकार्गो हा एमिरेट्सचा मालवाहतूक विभाग असून त्यांनी यंदा मे आणि जून महिन्यात आंब्यांची विक्रमी वाहतूक नोंदवली आहे. हवाई मालवाहतूक सेवेने मागील वर्षातील मे महिन्यातील कालावधीच्या तुलनेत यंदा 50% ची वाढ झाल्याचा अनुभव घेतला . जवळपास 1130 टन आंबे मुंबईतून जगभरातील विविध ठिकाणांवर एमिरेट्स स्कायकार्गो विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून मे 2018 दरम्यान पोहोचवले गेले. हे आंबे दोन्ही कार्गो, म्हणजे पॅसेंजर एअरक्राफ्ट व फ्रेटर एअरक्राफ्टमधून पाठवण्यात आले. एप्रिल 2018 पासून भारतातून एमिरेट्स स्कायकार्गोकडून 2650 टनहून अधिक आंब्यांची निर्यात करण्यात आली, त्या पैकी 2142 टन आंबे मुंबईतून पाठविण्यात आले. मध्य पूर्व, युके युएसए, कॅनडा आणि युरोपातील इतर भागांमधील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्यांची वाहतूक एमिरेट्स स्कायकार्गोमधून करण्यात आली. भारत हा जगातील एक महत्त्वाचा आंबा निर्यातदार असून दरवर्षी एप्रिल आणि जून या महिन्यांत निर्यात हंगाम शिखरावर असतो. देशातील महाराष्ट्र राज...