बँक ऑफ इंडियाच्या नफ्यामध्ये वाढ
बँक ऑफ इंडियाच्या नफ्यामध्ये वाढ बँक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यामध्ये वाढ झाली आहे. संचालक मंडळाने जाहीर केलेल्या पहिल्या तिमाहीच्या (2019-20) बँक ऑफ इंडियाच्या नफ्यामध्ये 155 टक्क्यांनी वाढ होऊन एकूण वाढ 243 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँक ऑफ इंडियाच्या 30 जून 2019 पर्यंतचा एकूण व्यवसाय 8,88,315 कोटी आहे. मागील वर्षी (30 जून 2018) हाच आकडा 8,78,351 कोटी रुपये इतका होता. जून महिन्यांपर्यंत ग्लोबल अॅडव्हान्सेस तुलनेत 3,76,078 कोटींवरून 3,63,474 कोटी इतकी वाढ झाली आहे. डिपॉझिटमध्ये वाढ झाली असून 5,12,237 वरून 5,14,604 कोटी इतकी आहे. बँक ऑफ इंडियाच्या ग्रोस एनपीएमध्ये जून 2019 पर्यंत 62,062 कोटी इतकी वाढ झाली आहे. मार्च 2019 मध्ये हाच आकडा 60,661 कोटी इतका होता. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेस महाव्यवस्थापक आणि सीएफओ के. व्ही. राघवेंद्र, कार्यकारी संचालक ए. के. दास, एन. दामोदरन, सी. जी. चैतन्य उपस्थित होते.