पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ
पेंट प्रोटेक्शन फिल्म्स ची सुरूवात करत गरवारे यांनी केली उत्पादन श्रेणीत वाढ मुंबई, ऑक्टोबर २०१९ - गरवारे पॉलिस्टर लिमिटेड (बीएसई:५००६५५- एनएसई:गरवारेपॉलि) या पॉलिस्टर फिल्मच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक असलेल्या कंपनी ने आज भारतात पेंट प्रोटेक्शन फिल्म्सची सुरूवात केल्याची घोषणा केली. अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेल्या व सुरक्षेने युक्त असलेल्या या फिल्म मध्ये धक्का सहन करण्याची सर्वाधिक क्षमता असून ही फिल्म क्लियर आणि सेल्फ हिलिंग पेंट प्रोटेक्शन फिल्म आहे. अतिशय अद्ययावत अशा फिल्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून संपूर्णत: भारतात तयार करण्यात आलेली ही फिल्म असून कंपनीच्या इन हाऊस तंत्रज्ञानाने युक्त असे हे गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म उत्पादन असून हे उत्पादन भारतीय हवामान आणि रस्त्यांच्या स्थिती नुसार तयार करण्यात आलेले आहे. सर्वाधिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आलेल्या या गरवारे पेंट प्रोटेक्शन फिल्म चे उत्पादन हे विशेष रूपाने तयार करण्यात आलेल्या थर्मोप्लास्टिक पॉलियुरेथिन फिल्म (टीपीयू) चा उपयोग करून करण्यात आले आहे. सातत्यप...