रुपया प्रगती पथावर असल्याचे जागतिक संकेत
रुपया प्रगती पथावर असल्याचे जागतिक संकेत सप्टेंबर २०२० च्या सुरुवातीपासून इतर उदयोन्मुख बाजाराच्या चलनासह रुपयाच्या मूल्यातही १.९ टक्के वाढ दिसून आली आहे. जोखिमीच्या मामत्तांचे मूल्य वाढत असताना, याच कालावधीत डॉलर निर्देशांकात ०.८५ टक्क्यांची घसरण दिसली. अमेरिका सरकारच्या दुस-या प्रोत्साहन पॅकेजसह, लसीच्या तयार होण्याच्या वेगवान हालचालींमुळे गेल्या काही महिन्यात सकारात्मक जागतिक संकेत आले. परिणामी भारतीय रुपयाचे मूल्य वधारले. आगामी कालावधीत रुपयाची प्रगती कशी असेल याबद्दल सांगताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे संशोधन विश्लेषक श्री वकारजावेद खान. २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८.८ टक्क्यांनी वाढेल: १५ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात ९७,००० रुग्णांचा आकडा गाठल्यानंतर भारतातील कोरोना विषाणूची रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. रुग्ण कमी होत असतानाच बरे होणा-यांचे प्रमाणही वाढत आहे. सध्या हे प्रमाण ८८.८ टक्क्यांपर्यंत आहे. तथापि, रुग्णांची संख्या वाढत असली तरीही अपेक्षित मागणी २०२१ वित्त वर्षातील दुस-या अर्ध्या वर्षात दिसून येईल. आयएमएफच्या ताज्या अंदाजानुसार, २०२० मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये १०.३ ट...