भविष्य घडविणाऱ्या योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा
भविष्य घडविणाऱ्या योजनांवर राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा -२१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २९: देशवासीयांचे भविष्य घडविणाऱ्या कल्याणकारी योजना, अभियान, उपक्रमावर आधारित राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा भरविण्यात आली असून www.pmvision2art.com या संकेतस्थळावर २१ ऑक्टोबरपर्यंत पोस्टर अपलोड करण्याची मुदत देण्यात आली आहे. स्पर्धकांनी ए२ आकारातील पोस्टर पीडीएफ, जेपीईजी, पीएनजी (हाय-रेझोल्यूशन) मध्ये हे पोस्टर अपलोड करायचे आहेत. सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची 'टर्न व्हिजन इनटू आर्ट : डिझाइन द पोस्टर, सेलिब्रेट द डिकेड' अशी थीम ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा सर्व नागरिकांसाठी खुली आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, वेव्ह्ज समिट, वातावरण बदल, योगा आदी विषय या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत. ७५ विजेत्यांना पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मान...