ट्रेडइंडियाद्वारे 'कंझ्युमर गुड्स एक्सपो इंडिया २०२०'चे आयोजन
ट्रेडइंडियाद्वारे 'कंझ्युमर गुड्स एक्सपो इंडिया २०२०'चे आयोजन मुंबई, २६ नोव्हेंबर २०२०: भारतातील आघाडीच्या बी२बी बाजारपेठांपैकी एक असलेल्या ट्रेड इंडिया 'कंझ्युमर गुड्स एक्सपो २०२०' या भारतातील एमएसएमई इकोसिस्टिमसाठी जगातील सर्वात मोठ्या व्हर्चुअल एक्सपोझिशनसाठी उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार करत आहे. न्यू नॉर्मलमध्ये नव्या व्यवसाय संधी शोधण्यासाठी पॅकेज्ड व ड्युरेबल गुड्ससाठीचे भारतीय निर्माते, पुरवठादार, निर्यातदारांना ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणारा हा पहिलाच ट्रेड इव्हेंट मदत करेल. देशातील लघु आणि मध्यम व्यवसायिकांसाठी नव्या व्यावसायिक कल्पना आणि सहकार्याची भरभराट करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. भारतातील एमएसएमई क्षेत्रातील प्रदर्शनकर्त्यांना, त्यांची विविध उत्पादने, सेवा व्हिडिटर्ससमोर प्रदर्शित करता येतील. यामुळे योग्य पुढाकाराद्वारे आकर्षक व्यावसायिक भागीदारी वाढवण्यास मदतत मिळेल. देशातील उत्पादक, पुरवठादार आणि निर्यादकांना त्यांची उत्पादने थ्रीडी प्रॉडक्ट डिस्प्लेद्वारे आंतरराष्ट्रीय ग्राहकांसमोर प्रदर्शित करता येतील. तसेच सर्वसमावेशक व्यवसाय प्रदर्शनाद्वारे ...