भारतात व्हेरिकोज व्हेन्सवर आता केवळ 30 मिनिटांत उपचार करता येणार
भारतात व्हेरिकोज व्हेन्सवर आता केवळ 30 मिनिटांत उपचार करता येणार मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय ‘ द व्हेन सेंटर ’ या शिरांवर उपचार करणाऱ्या क्लिनिकने व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्यासाठी ‘बायो फिल्म कॉम्प्रेशन’ नावाचे एक नवे तंत्रज्ञान सुरू केले आहे मुंबई , 27 नोव्हेंबर , 2019 : मुंबईतील द व्हेन सेंटर ने रुग्णांना सोईस्कर असणारे , वापरण्यास सुलभ आणि एकंदरच प्रभावी असणारे नवे कॉम्प्रेशन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. या नव्या विलक्षण अशा कॉम्प्रेशन तंत्रज्ञानाला बायोफिल्म/कॉम्प्रेशन फिल्म बँडेज म्हटले जाते. व्हेरिकोज व्हेन्ससाठी शिरांतर्गत उपचार करून झाल्यावर लगेचच हे आपोआप चिकटणारे , लवचिक , पारदर्शक फिल्म बँडेज त्यावर लावले जाते. व्हेरिकोज व्हेन्सचा गंभीरपणा आणि त्वचेचे एकंदर आरोग्य यानुसार बायोफिल्म साधारण 2 ते 4 आठवडे टिकून रहाते. पायावर बायोफिल्म लावली असताना देखील व्यक्ती त्यांची दैनंदिन कामे आणि खेळ , क्रीडा , पोहणे , रोजचा चालण्याचा व्यायाम कोणत्याही विशेष त्रासाशिवाय पार पाडू शकतात. इतर कॉम्प्रेशन पद्धतीत हे शक्य होत ना...