हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर ४६ वर्षीय व्यक्तीला अखेर कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद मिळणार
हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांहून अधिक काळ राहिल्यानंतर ४६ वर्षीय व्यक्तीला अखेर कुटुंबासोबत नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद मिळणार जतिन स ं घवी या ४६ वर्षीय व्यक्तीला कोविड-१९च्या विविध जटिल लक्षणांमधून बाहेर आल्यानंतर नवजीवन मिळाले. भाटिया हॉस्पिटलमध्ये विषाणूशी दोन महिन्यांहून अधिक काळ लढा दिल्यानंतर ते हॉस्पिटलमधून बरे होऊन आले. तो अत्यंत लठ्ठ होता आणि त्याला उच्च रक्तदाब , दमा व स्लीप एपनियाचा त्रास होता. ज्यामुळे उपचार करणे अत्यंत अवघड झाले. तो १५ ऑक्टोबर रोजी भाटिया हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्यापासून ५५ दिवस आयसीयूमध्ये होता. एका क्षणाला डॉक्टरांनी विषाणूपासून त्याला वाचवण्याची आशा सोडून दिली होती. त्याच्या शरीरामध्ये पाणी जमा झाले होते आणि त्याच्या वजनामुळे सीटी स्कॅन देखील करता आले नाही. डॉ. मनिष मवानी आणि डॉ. सुजीत राजन म्हणाले की , तो सहजपणे उपचार करता येणारा रूग्ण नव्हता. आम्ही त्याच्या वजनामुळे त्याच्या फुफ्फुसामध्ये झालेले इन्फेक्शन जाणून घेण्यासाठी सीटी स्कॅन करू शकलो नाही. आम्ही त्याची तपासणी केली तेव्हा ऑक्सिजन ...