एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा 920 कोटी रुपयांचा आयपीओ 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा 920 कोटी रुपयांचा आयपीओ 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार • प्राईस बँड प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 147 ते 155 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. • बोली/ऑफर सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुली होईल आणि बुधवार, 7 फेब्रुवारी, 2024 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 रोजी बोली लावता येईल. • कमीत कमी 96 इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 96 च्या पटीत बोली लावावी लागेल. राष्ट्रीय, 31 जानेवारी, 2024: एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडचा ("द पार्क" किंवा "कंपनी") आयपीओ सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 रोजी खुला होणार आहे. या ऑफरमध्ये एकूण 9200 मिलियन रुपयांचे (920 कोटी रुपये) इक्विटी समभाग असून त्यामध्ये 6000 मिलियन रुपयांच्या (6०० कोटी रुपये) नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा आणि समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या समभागधारकांकडून विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या 32०० मिलियन रुपयांच्या (32० कोटी रुपये) इक्विटी समभागांचा समावेश आहे....