कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक CAR-T थेरपीने रुग्णाला आक्रमक रिलॅप्स्ड लिम्फोमातून पूर्णपणे बरे केले
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक CAR-T थेरपीने रुग्णाला आक्रमक रिलॅप्स्ड लिम्फोमातून पूर्णपणे बरे केले ३९ वर्षाचे रिजेश यांच्यासाठी अत्याधुनिक CAR-T उपचारांमुळे २०२४ हे वर्ष नवीन आशेने समाप्त झाले आणि कॅन्सर मुक्त होऊन त्यांनी २०२५ चे स्वागत केले नवी मुंबई, 03 जानेवारी, 2025: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आपल्या करियरच्या शिखरावर असलेले कॉर्पोरेट प्रोफेशनल, ३९ वर्षांचे रिजेश आणि त्यांच्या कुटुंबियांना आक्रमक लिम्फोमाच्या रिलॅप्सने खूप मोठा धक्का दिला. हा लिम्फोमा पारंपरिक उपचारांना प्रतिरोधक असल्याने हे सगळेच अतिशय निराश झाले होते. पण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबईमध्ये अभिनव CAR-T थेरपीने रिजेशना कॅन्सरपासून पूर्णपणे मुक्ती मिळवून दिली आणि त्यांचा जीव वाचवला. ऑक्टोबर २०२३ मध्ये समजले की रिजेशना डिफ्युज लार्ज बी-सेल लिम्फोमा (डीएलबीसीएल) झाला होता, हा नॉन-हॉजकिन लिम्फोमा (एनएचएल) च्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. त्यांच्यावर स्टॅन्डर्ड फर्स्ट-लाईन उपचार केले गेले, यामध्ये आर-सीएचओपी (R-CHOP) केमोथेरपीचा देखील समावेश होता, यामध्ये सीएनएसमध्य...