के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन
के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन अलीकडच्या जगात‘शाश्वत विकास’ हा शब्द लोकप्रिय झाला आहे. के,रहेजा कॉर्पच्या लँडमार्क कमर्शियलने ऐरोली इस्ट येथील माइंडस्पेसमध्ये कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा एक नवीन मार्ग तयार केला. भारतात पंतप्रधान कार्यालयातर्फे सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा झाल्यावर त्या तत्वाचा अंगीकार करत आपल्या बिझनेस पार्कमध्ये शाश्वत विकासाच्या दिशेने यंत्रणा उभारली गेली. त्याठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याच्या प्रत्येक तुकड्यावर पार्क अंतर्गत पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यात येतो. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने या बिझनेस पार्कचा शहराच्या पालिकेवर ताण पडत नाही. आपल्या ताज्या बिझनेस दौऱ्यादरम्यान स्वच्छ भारत मिशनचे सह-सचिव श्री. विनोद जिंदाल यांनी नवी मुंबईचे आयुक्त डॉ. एन रामस्वामी यांच्यासह याठिकाणची पाहणी केली आणि टीमला त्यांचा उपक्रम आणि मेहनतीबद्दल अभिनंदन केले. इतर उपक्रमांमध्ये ऐरोली इस्ट माइंडस्पेस एसईझेडने ओडब्ल्यूसी युनिट्स बसवले आहे, यामध्ये बिझनेस पार्कमधील ओल्य...