डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा’ सादर
डिफाइनेज सिक्युरिटीजतर्फे अल्गो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा ’ सादर पुणे येथे मुख्यालय असलेल्या, नाविन्यपूर्ण ट्रेडिंग टूल्स आणि गुंतवणूकदारांच्या शिक्षणाच्या मजबूत परिसंस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या डिफाइनेज सिक्युरिटीज ब्रोकिंग प्रा. लि. या फिनटेक व स्टॉक ब्रोकिंग कंपनीने आज आपला आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा प्लॅटफॉर्म ‘अल्गोस्ट्रा ’ सादर केला. प्लॅटफॉर्म शुल्क शून्य असलेला आणि भारतातील पहिला पूर्णपणे कस्टमाइझ करता येणारा हा रिटेल ट्रेडिंग ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आहे. सेबीने ऑक्टोबर २०२५ मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी अल्गोरिदमिक ट्रेडिंग अधिकृतपणे खुले केले, त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हा ‘अल्गोस्ट्रा ’ प्लॅटफॉर्म सादर होत असल्याने, हा क्षण भारतीय रिटेल ट्रेडिंगसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. रिटेल ट्रेडिंग ऑटोमेशन प्लॅटफॉर्म सादर करण्यासाठी आताचीच वेळ अतिशय योग्य आहे. ‘सेबी ’ च्या स्वतःच्या अभ्यासानुसार, एफवाय २४मध्ये एफ अँड ओ विभागात अल्गोरिदमिक ट्रेडिंगवर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि प्रोप्रायटरी ट्रेडर्स यांचेच वर्चस्व राहिले. एफपीआय नफ्यातील ९७ टक्के आण...