'डेस्टिनेशन उत्तराखंड: इन्व्हेस्टर्स समिट २०१८' उत्तराखंड सरकारने घातली महाराष्ट्रातील व्यापार विश्वाला साद
' डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट २०१८ ' उत्तराखंड सरकारने घातली महाराष्ट्रातील व्यापार विश्वाला साद ~ डेहराडून येथे ७ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या ' डेस्टिनेशन उत्तराखंड - इन्व्हेस्टर्स समिट १८ ' चे माननीय पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ~ उत्तराखंड सरकारने ७ - ८ ऑक्टोबर २०१८ दरम्यान आयोजित केलेल्या ' डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट ' या शिखरपरिषदेची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आज मुंबईमध्ये एका रोड शोचे आयोजन करण्यात आले होते . उत्तराखंड राज्याची ही पहिलीच शिखर परिषद डेहराडून येथे पार पडणार असून माननीय पंतप्रधान श्री . नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होणार आहे . उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री श्री . त्रिवेंद्र सिंग रावत आणि श्री. सत्पाल महाराज , पर्यटन मंत्री , उ त्तराखंड सरकार यांनी या रोड शोला संबोधित केले . मुंबईमध्ये झालेल्या या सभेसमोर उत्तराखंड सरकारमधली काही वरीष्ठ उच्चपदस्थांनीही आपले विचार मांडले . यात मुख्य सचिव श्री . उत्पल कुमार सिंग , उद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीम . मनिषा ...