ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स’तर्फे अरावन – भारताची पहिली प्रगत अचूक एअरगन लॉन्च्

ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स’तर्फे अरावन – भारताची पहिली प्रगत अचूक एअरगन लॉन्च् • उत्साही आणि पारखी व्यक्तींकरिता तयार करण्यात आलेली ही दर्जेदार एअरगन पूर्वी केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी उपलब्ध असलेल्या अनेक वैशिष्ट्यांसह येते • प्री-चार्ज्ड न्यूमॅटिक (पीसीपी) एअरगन, अरावन, हे ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्सचे उद्घाटनपर उत्पादन असून ते त्याचे विक्रेते आणि वितरकांच्या वाढत्या नेटवर्कद्वारे भारतभर उपलब्ध असेल • मेक-इन-इंडिया उपक्रमांतर्गत फील्ड-शूटिंग श्रेणीत दोषरहित इंजिनिअरिंग उपकरणांची जागतिक मानके वितरीत करण्यासाठी ट्रॅजेक्ट्रॉनची वचनबद्धता अरावन प्रतिबिंबित करते ट्रॅजेक्ट्रॉन स्पोर्ट्स, भारतातील सर्वात तरुण परवानाधारक एअरगन उत्पादकाने आज आपले उद्घाटन उत्पादन 'अरावन' लॉन्च केले. जे उत्कृष्ट क्षेत्र-नेमबाजी उत्साही आणि पारखी लोकांच्या वैयक्तिक गरजेनुरूप तयार करण्यात आलेली प्रगत एअरगन आहे. अरावन ही भारताची पहिली, सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीची आणि उत्पादित प्री-चार्ज्ड न्यूमॅटिक (पीसीपी) एअरगन मानली जाते. जी सर्वात स्पर्धात्मक किंमतींवर गुणवत्तेच्या बाबतीत जागतिक मानके...